पिसाट मनोरुग्णांकडून पूर्व प्राथमिक शाळांच्यातून शिकत असलेल्या छोट्या शिशूंच्यावरच्या हल्ल्यांनी आता जास्त भयंकर स्वरूप धारण केले आहे असे दिसते. काल म्हणजे 11 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास शान्शी प्रांतामधे, नैऋत्येकडे असलेल्या, नानझेंग काउंटीच्या ग्रामीण भागातील एका पूर्व प्राथमिक बालशाळेत खेळत असलेल्या मुलांच्यावर एका पिसाट माणसाने हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 मुले जखमी झाली व सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या नराधमाने 7 मुलांवर कुर्हाड चालवली व या निष्पाप मुलांचा निष्कारण बळी घेतला.
या भागात साहजिकच अतिशय भितीचे वातावरण पसरले आहे. चिनी माध्यमांनी ही बातमी प्रसृत केल्यानंतर साहजिकच मोठा सार्वजनिक क्षोभ व असंतोष निर्माण झाला आहे. प्रांतीय व राष्ट्रीय सरकारने काहीतरी पावले उचलणे गरजेचे आहे असे साहजिकच सर्वांना वाटते आहे.
12 मे 2010
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा