रविवार, सप्टेंबर ०५, २०१०

चिनी पाट्या- लई भारी!1960च्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशभर आणीबाणी जाहीर केली होती. काळात सगळीकडे " बाते कम काम जादा" सारखी वचने लिहिलेल्या मोठमोठ्या पाट्या लावलेल्या असत. या पाट्यांच्यावर एक असंबंधित चित्र, व हिंदी व इंग्रजीमधे लिहिलेला एक संदेश असे. बहुतेक वेळा हिंदी वाक्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले असल्याने त्या इंग्रजी वाक्याचा अर्थ काहीतरी दुसराच निघू शकत असे. या कारणामुळे मला ह्या पाट्या वाचायला आवडत.
पुण्याच्या लोकांना जिकडे तिकडे पाट्या लावायला खूप आवडते. अनोळखी घरात शिरताना दारावरच्या पाहुण्याने काय करावे? कोणते वर्तन चालेल? कोणते चालणार नाही. हे अचूकपणे लिहिलेल्या पाट्या दिसतात. काही दुकानदार आपण विकत असलेल्या मालाचे वर्णन करताना " येथे दणकट लंगोट मिळतील " अशा पद्धतीच्या पाट्या लावून बरीच मजा आणतात.
हे सगळे असले तरी पाट्या लावण्याच्या बाबतीत चिनी लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही. उद्‌बोधक पाट्या, उत्साहवर्धक पाट्या, सूचना देणार्‍या पाट्या जागोजागी लावलेल्या असतात. शाळांमधे तर पाट्याच पाट्या असतात. आणीबाणीमधल्या भारतीय पाट्यांप्रमाणेच या पाट्यावर काहीतरी चित्र व एक मॅन्डरिन व इंग्रजी भाषेतला संदेश लिहिलेला असतो. इंग्रजीमधे लिहिलेला हा संदेश मॅन्डरिनमधून भाषांतर करून लिहिलेला असल्याने बर्‍याच वेळा अतिशय विनोदी असतो. चिनी लोकांच्या इंग्रजीला चिंगलिश असे नाव आता पडले आहे. हुईझॉऊ बोलुओ एक्स्पेरिमेन्टल स्कूल (Huizhou Boluo Experimental School)) या शाळेमधे लावलेल्या अशा काही चिन्गलिश मधल्या पाट्यांची मला आवडलेली उदाहरणे.

विद्यार्थी निवासामधली मेट्रनची खोली.

तुमच्या थाळीतला प्रत्येक दाणा पिकवायला अमाप कष्ट पडतात हे तुम्हाला माहित आहे का?

काटकसरीने जगण्यासाठी अन्न व वस्त्रे या बाबत फार आग्रही राहू नका.दुसर्‍याला सहाय्य आणि मदत करण्यासाठी एकता आणि प्रेम

हळू चाला. दुसर्‍यांना विचलित करू नका.

पर्यावरणाची जपणूक करा. उधळेपट्टीला विरोध करा.
अन्नाला संपत्ती मानणे हा चांगला गुण आहे.
प्राथमिक शाळेचे कॅन्टीन

आंतरजाल कार्यालय, सॉफ्टवेअर उत्पादन खोली
संस्थेत शांतता पाळा. गडबड करू नका व दुसर्‍याला पकडण्यासाठी धावू नका.
वैयक्तिक आरोग्यासंबंधी  चांगल्या सवई लावून घेण्यासाठीस्वत:ला जाणा.
 थूंकू नका
आहेत की नाही लई भारी! या पाट्यांवरून एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली. हुईझॉऊ बोलुओ एक्स्पेरिमेन्टल स्कूल या शाळेत जे विषय शिकवले जातात त्यात इंग्लिश हा विषय नक्कीच नाही.हा!हा!हा!
5 सप्टेंबर 2010


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Kaka mala ek pan pati kalali nahi. Bahuda tumcha haach mudda aahe. Bhannat patya aahet. Masta post aahe. Maja aali vachun.

-Kedar