बुधवार, मे १२, २०१०

निष्पाप छोट्या मुलांच्या वरचे हल्ले (Latest Update)


पिसाट मनोरुग्णांकडून पूर्व प्राथमिक शाळांच्यातून शिकत असलेल्या छोट्या शिशूंच्यावरच्या हल्ल्यांनी आता जास्त भयंकर स्वरूप धारण केले आहे असे दिसते. काल म्हणजे 11 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास शान्शी प्रांतामधे, नैऋत्येकडे असलेल्या, नानझेंग काउंटीच्या ग्रामीण भागातील एका पूर्व प्राथमिक बालशाळेत खेळत असलेल्या मुलांच्यावर एका पिसाट माणसाने हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 मुले जखमी झाली व सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या नराधमाने 7 मुलांवर कुर्‍हाड चालवली व या निष्पाप मुलांचा निष्कारण बळी घेतला.

या भागात साहजिकच अतिशय भितीचे वातावरण पसरले आहे. चिनी माध्यमांनी ही बातमी प्रसृत केल्यानंतर साहजिकच मोठा सार्वजनिक क्षोभ व असंतोष निर्माण झाला आहे. प्रांतीय व राष्ट्रीय सरकारने काहीतरी पावले उचलणे गरजेचे आहे असे साहजिकच सर्वांना वाटते आहे.
12 मे 2010

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: